प्रतिनिधी / भंडारा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा नगरा च्या वतीने चालविल्या जात असलेल्या डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्‍या माध्‍यमातून गरजूंसाठी सुरू असलेल्या सेवा प्रकल्पाला मदत म्हणून महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा भंडाराच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश आज देण्यात आला. समितीच्या वतीने सध्या जिल्हाभर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचा असंच वाटपाचे काम सुरू आहे.

संकटाच्या काळात नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी सज्ज असतात. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीच्या वातावरणात हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. काम नसल्याने हातात पैसे नाही. रोजच्या गरजा भागविणेही होऊन बसले आहे. अशांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे आला आहे. डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्‍या त्यामधून जीवनावश्यक साहित्याचा संच करून गरजूंना पुरविला जात आहे.

संघाच्या सेवाकार्यात आपला वाटा असावा आणि गरजूंना आपल्याकडून ही मदत व्हावी या उदात्त हेतूने महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा भंडारा शाखेच्यावतीने 51 हजार रुपयाचा धनादेश संघाच्या सुपूर्द करण्यात आला. यावेळी हेमंत कविमंडन, शेखर जोगळेकर, मुकुंदा पांढरीपांडे हे ब्राह्मण सभेचे संघाचे जिल्हा कार्यवाह अतुल जी दिवाकर, नगर कार्यवाह रामकृष्णजी बिसने, शंतनु व्यवहारे उपस्थित होते. ब्राह्मण सभेच्या च्या वतीने सेवा कार्यासाठी केलेली ही मदत नक्कीच या क्षणाला अत्यंत उपयुक्त अशी आहे. ब्राह्मण समाजातील प्रत्येक बांधवांनी मदतीत खारीचा वाटा राहावा म्हणून मदत निधी ब्राह्मण सभेच्या खात्यावर किंवा मुकुंदा पांढरीपांडे यांच्याकडे करण्याचे आवाहनही ब्राह्मण सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY