अकोलासह राज्यातील विमानतळांना सर्व सोयीसुविधा पुरविणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
413

प्रतिनिधी/नागपूर- अकोला (शिवणी) विमानतळाच्या प्रलंबित समस्यासह राज्यातील इतरही विमानतळाच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी लवकरच संबंधितांची बैठक घेवून राज्यातील विमानतळांना सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य गोपीकिशन बाजोरिया, यांनी मांडली होती.
श्री. ठाकरे म्हणाले, अकोला (शिवणी) विमानतळाची धावपट्टी, जमिनीचे भूसंपादन व इतर प्रलंबित प्रश्नांबाबतची माहिती उपलब्ध झाली असून याबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांची बैठक घेवून हे प्रश्न लवकरात लवकर सोडविले जातील. या बैठकीतच राज्यातील इतर विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेवून त्या विमानतळांनाही सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याचेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, शरद रणपिसे, रवींद्र फाटक यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY