ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

0
246

प्रतिनिधी / हिंगोली- जिह्याला ध्वज दिन निधी संकलनाचे 2019 साठीचे 19 लाख 92 हजार रूपयांचे उद्दीष्ट असून सर्व विभागांनी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन-2019 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात जयवंशी  बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कौशल्य विभागाच्या सहायक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले की, सशस्त्र संरक्षण दलाचे जवान हे देशाच्या सिमेवर प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या रक्षणाकरीता सेवा करतात. त्यांच्या त्यागामुळेच देशातील सर्व नागरिक सुखी जीवन जगतात. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन होय. माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबीय यांच्या कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते.  सशस्त्र संरक्षण दलाचे जवान आणि त्यांच्या कुटूंबीयाची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतून सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ही जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.

यावेळी पोलीस अधिक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, यांनी समयोचित मार्गर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधीचे संकलन करण्यास

यावेळी  जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. ज्या विभागानी निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी येथील गंगाराम देवडा अंध विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्वागत आणि देशभक्तीपर गीतं सादर केली. कार्यक्रमात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीय यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. शिवाजी इंगोले यांनी केले तर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  संजय कवडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY