राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट

0
327

प्रतिनिधी / मुंबई- शेतकरी हितासाठी अविरत संघर्ष करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना ते शेतकऱ्यांना योग्य न्याय देतील, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला.

आज विधानभवन येथे मुंबई दौऱ्यावर असलेल्या श्री.गेहलोत यांचे विधानसभा अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. गहलोत यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री.पटोले यांचे अभिनंदन केले.

यावेळी राजस्थान सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने काम करीत आहे त्यासंदर्भात श्री.पटोले यांनी माहिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसुळ, माजी आमदार कँप्टन अभिजीत अडसुळ, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ.सतिश गवई आणि विधीमंडळ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY