प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह साजरा होणार

अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते आज सप्ताहाचे उद्घाटन

0
189

प्रतिनिधी / हिंगोली- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अप्प्र जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुसंपादन उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, सहायक गट विकास अधिकरी बोथीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (एस.व्ही.एस.टी) पुरुषोत्तम कुटे आणि या योजनेचे  जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी असंघटीत कामगार गजानन पवार यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY