तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जनसेवक हरपला -मुख्यमंत्री

0
225

प्रतिनिधी / मुंबई – माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने संवेदनशील जनसेवक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी राज्यमंत्री दिघोळे यांनी 1985 ते 1999 या कालावधीत तीन वेळेस आमदार म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडले. युती सरकारच्या काळात ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी नाशिक येथील व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे शैक्षणिक, राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य नेहमीच स्मरणात राहील.

LEAVE A REPLY