पंतप्रधान कौशल्य विकास प्रमाणपत्र वाटप व रोजगार मेळावा संपन्न

0
268

प्रतिनिधी/हिंगोली- युवा विकास सोसायटी संंचालित, सृजन स्किल सेंटर मार्फत पंतप्रधान कौशल्य प्रशिक्षण चालविले जात आहे. या प्रशिक्षण कार्यक‘मातील प्रशिक्षित लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व कयाधू गारमन्टेस व वैष्णवी हायटेक ब्युटी पार्लर यांच्या मार्फत प्रशिक्षिण लाभार्थ्यांना रोजगार नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक‘म महाविर भवन येथे आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक‘माचे उद्घाटन आ.तान्हाजीराव मुटकूळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी शिलचंद्रजी देशमुख होते. या कार्यक‘मास प्रमुख पाहुणे म्हणून गोदावजी अर्बन बँकेचे चेअरमन सौ.राजश्रीताई हेहमंत पाटील याशिवाय माजी आ.गजाननरावजी घुगे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, के.के.शिंदे, उमेश गुठ्ठे, जितसिंह साहू, बाबुराव कदम, डॉ.हंसराज खुराणा, डॉ.सचिन बगडीया, डॉ.हंसा बगडीया अदींची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक‘माच्या उद्घाटनपर भाषणामध्ये आ.तान्हाजीराव मुटकूळे यांनी प्रशिक्षणार्थी व संचालक आशिष वाजपेयी यांच्या कार्याचे कौतूक केले. हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हे स्किल सेंटर कौशल्य देवुन तसेच त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे. जिल्ह्याला बेरोजगार मुक्ती करण्यासाठी त्यांनी या प्रशिक्षण केंद्रास शुभेच्छा दिल्या. सौ.राजश्रीताई पाटील यांनी महिला स्वालंबी व आत्मविश्वासू कश्या बनविता येतील या विषयीचे प्रेरणादायक मार्गदर्शन केले. या कार्यक‘मात 325 प्रशिक्षतांना प्रमाणपत्र व 71 प्रशिक्षित लाभार्थ्यांना चंद्राक्ष प्रतिष्ठान तर्फे रोजगार पत्र देण्यात आले. अध्यक्षीय समारोप करतांना शिलचंद्रजी देशमुख(विभाग संघ चालक, राष्ट्रीय स्वंय संघ) युवा विकास सोसायटीच्या माध्यमातून PMKVY केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत चालणार्‍या सृजन स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुळे हिंगोली जिल्ह्याची बेरोजगारी कमी होवून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हिंगोलीचा विकास खर्‍या अर्थाने होणार आहे. व युवकांना आर्थिक सक्षम बनविण्यास मदत होणार आहे. या कार्यक‘माचे आयोजन आशिष वाजपेयी व रविंद्र फड यांनी केले. या कार्यक‘माचे सुत्रसंचालन उमेश घुगे, आभार प्रदर्शन जयश्री गायकवाड यांनी केले. या कार्यक‘मासाठी रेश्मा मलिये, माया पुरी, एैश्वर्या हलगे, रंजना पुंडगे, विजया मिस्किन, सुनिता ढोंबरे, जयश्री झाडे, कल्पना कारवखे, रेणुका आसणकर, सारिका शिंदे, कल्याणकर, दशरथ पवार, पवनकुमार वानखेडे, राजु आमटे, अनिल खांडेकर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY