राफेर प्रकरणी राहुल गांधीवर कारवाई करण्याची मागणी

0
214

प्रतिनिधी/हिंगोली- केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षेच्या द़ृष्टीकोनातुन राफेल विमानाची खरेदी केली. याप्रकरणी चौकशीतुन क्लीनचिट मिळाल्याने बिनबुडाचे आरोप करणार्‍या काँग्रेस अध्यक्षाविरूध्द कारवाई करण्याची मागणी भाजपा हिंगोली जिल्हा यांच्यावतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
मागील 5 वर्षाच्या काळात केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राफेल विमानाची खरेदी केली. सदरील खरेदी व्यवहार प्रकरणी विरोधी पक्षाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात चौकशीची याचिका दाखल केली. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना लोकसभा निवडणुक प्रचारात काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या माध्यमातुन केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत चौकीदार चोर आहे अशी बदनामीकारक वक्तव्य केली.
राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिनचिट दिली आहे. यासंदर्भातील पुर्ण चौकशी करण्यात आली असुन, विरोधी पक्षानी केलेले बिनबुडाचे आरोप बेजवाबदार आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारची नाहक बदनामी झाली आहे. या प्रकरणात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधी चौक येथे आंदोलन करीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी आ.तान्हाजी मुटकूळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, संजय खंडेलवाल, रामु यादव, ओम पाटील कोटकर, प्रकाश थोरात,
मिलींद यंबल, बाबा घुगे, दिनेश बगडिया, मनोज शर्मा, फुलाजी शिंदे, गणेश शिंदे, गजानन काळे, गोवर्धन विरकुंवर, अंकुश जयस्वाल, चंद्रकांत घोंगडे, गजानन दराडे, रमेश कर्‍हाळे, प्रल्हाद मुकाडे, कैलास हनवते, मधुकर हमाने, बाळासाहेब नाईक यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY