हिंगोली/प्रतिनिधी- शहरातील आई जगदंबा नवरात्र महोत्सव समितीच्या पुढाकाराने व आई जगदंबा दांडीया व गरबा महोत्सव समितीच्या वतीने  आई जगदंबा दांडीया व गरबा नवरात्र मोहतस्वाचे उद्घाटन मंगळवारी रात्री आठ वाजता प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्याच दिवशी शहरातील महिला, नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने आई जगदंबा मातेचे प्रांगण खचाखच भरल्याचे दिसून आले.
 महोत्सव समितीच्या सहकार्याने  दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य दांडिया, गरबा यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन एनटीसीतील छत्रपती शिवाजी राजे उद्यानात केले आहे. मंगळवारी दांडीया व गरबा महोत्सवाला सुरुवात झाली. प्रसिद्ध अभिनेत्री मला पिरतीच गोखरू सॉंग फेम अस्मिता देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दांडिया, गरबा,महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रायोजक व मान्यवरांचे अभिनेत्री अस्मिता देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सौ. उमाताई सोनी, डाॅ.श्री. सत्यनारायण सोनी,  डॉ. श्री. यशवंत पवार, डॉ. श्री. जयदीप देशमुख, डॉ.सौ. माधूरीताई देशमुख,  श्री. अतूल जैस्वाल,सौ.माधवीताई पाटील गोरेगावकर,  सचिन टाक,सौ संगीताताई मामडे, राजीव खुराणा, अभिजित निंगुरकर,सौ.संगिताताई दराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, यासह गरबा, दांडिया समितीचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
गरबा ,दांडियाचे अभिनेत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर स्वतः देशमुख यांनी गरबा खेळत स्थानिक महिला,युवती वर्गात उत्साह द्विगुणित केला. त्यानंतर नांदेड येथील प्रसिद्ध असलेल्या सुरसंगम अर्केस्त्रा यांच्या वतीने पाच राऊंड घेण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत मनमुरादपणे महिला, युवती दांडिया, गरबा खेळण्यात मग्न होते. येथील नैसर्गिक वातावरणात पाच दिवस दांडिया, गरबा पार पडणार आहे. गरबा, दांडिया पाहण्यासाठी शहरातील हजारोच्या संख्येने महिला, पुरुष दाखल झाले होते.यासाठी आई जगदंबा नवरात्र समितीच्या वतीने पुढाकार घेतला. नांदेड येथील सुरसंगमच्या साथीने दांडीया महोत्सव सुरू असून तिन लाख रूपयांची २२५ बक्षीसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY