निवडणूक आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा-फुलारी

0
122

प्रतिनिधी /हिंगोली- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी आज येथे दिल्या.

वसमत मतदारसंघातील निवडणूक विषयाच्या संदर्भात वसमत तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री. फुलारी यांनी सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्योती पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे आदि उपस्थित होते.

श्री. फुलारी यांनी साहित्य वितरण व्यवस्था, तपासणी सूची जोडपत्र, मतदान साहित्य तपासणी, व्हीव्हीपॅट, मशीन कसे सुरु करावे. मॉक पोल कसा घ्यावा, नमुना 17-क, अर्ज कसा भरावा याची माहिती दिली.

विधानसभा मतदारसंघतील जवळा बाजार, शिरड शहापूर, लोहरा बु. बाभुळगाव येथील मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे त्यांनी सांगितले. मतदान अधिकारी क्र. 1, 2, 3 यांची कर्तव्ये, चॅलेंज वोट, टेंडर वोट याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगासाठी केलेल्या सुविधेबद्दल त्यांनी सांगितले.  या बैठकीस क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY