प्रतिनिधी /हिंगोली- येथे नगर परिषद हिंगोली शहर प्लास्टिक कचरामुक्त होण्याच्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांना,व्यापा-यांना  एकदाच वापरल्या जाणा-या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवावा या करीता हिंगोली नगर परिषद तर्फे विशेष मोहीम दि.०१/१०/२०१९ ते ०३/१०/२०१९ या दरम्यान राबविण्यात येत आहे या मध्ये अग्रसेन चौक, गांधी चौक, भाजी मार्केट याठिकाणी ३ प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. नागरीका कडून एक वेळा वापरात येणारा प्लास्टिक जमा करून घेण्यात येत असेन त्यांना भेट म्हणून कापडी पिशवी देण्यात येत आहे.
दि. ०१/१०/२०१९ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गांधी चौक येथील प्लास्टिक संकलन केंद्राचे उद्धघाटन करून  सर्वप्रथम संकलन केंद्रामध्ये नागरीका कडून एकदाच वापरात येणारे प्लास्टिक घेऊन मा. जिल्हाधिकारी साहेबाच्या हस्ते नागरिकांना कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली. या वेळी जिल्हाचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार साहेब, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगर परिषदचे नोडल अधिकारी सनोबर तस्नीम, उप अभियंता रविराज दरक, स्वच्छता निरीक्षक आर.व्ही.बांगर, शहर समन्वयक आशिष रणसिंगे, डी.पी  शिंदे, गजानन बांगर,  शिवाजी घुगे, विजय इंगोले, दिलीप खंदारे हे उपस्थित होते. तसेच मा.जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकाना आवाहन केले आहे की एक वेळा वापरात येणारे प्लास्टिकचा वापर करू नये.
सदर स्वच्छता हि सेवा अंतर्गत मोहीम मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे या वेळी मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकाना आवाहन केले आहे की या प्लास्टिक संकलनमध्ये आपल्या कडील जमा असलेले एकदाच वापरात येणारे आपल्याकडील एकदाच वापरात येणा-या प्लास्टिकवस्तूं जसे प्लास्टिक कॅरीबॅग,प्लास्टिक ग्लास,चमचे,वाट्या,काटे,ताट,कप,प्लास्टिकची भांडी, स्टॉ, प्रोलीप्रोपोलीन बॅग्स,द्रव्य पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच इ. तसेच थर्मोकोल (पॉलिस्टायरीन) इत्यादी प्लास्टिक वस्तू असेल तर दि.०१ ऑक्टोंबर ते ०३ ऑक्टोंबर पर्यंत आणून द्यावे. ३ ऑक्टोंबर नंतर जर कुठे प्लास्टिक आढळलयास कुणाची गय केली जाणार नाही त्यांच्या कडून दंड वसूल करून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सदरील एकदाच वापरात येणा-या प्लास्टिक वस्तूंचा वापर करण्यास प्लास्टिक बंदी अधिसूचनान्वये शासनामार्फत संपूर्णत: बंदी घालण्यात आलेली आहे. याबाबत नगरपरिषदे मार्फत वारंवार जनजागृती करून वेळोवेळी जाहीर सुचनेद्वारे कळविण्यात आलेले आहे.
तरी हिंगोली शहराच्या स्वच्छतेबाबत सक्रीय सहभाग नोंदउन आपले शहर संपूर्णत: प्लास्टिकमुक्त करण्याकरिता आपले मोलाचे सहकार्य करून जिम्मेदार नागरिकाचे कर्तव्य बजावावे.

LEAVE A REPLY