निवडणूक खर्च निरीक्षक जुंगीओ यांचे हिंगोलीत आगमन

0
204

प्रतिनिधी /हिंगोली- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनूरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी नागगोथुंग जुंगीओ यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

श्री. जुंगीओ यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. श्री. जुंगीओ उमेदवारांच्या निवडणूक खर्चासंदर्भात समस्या, तक्रारी, ऐकण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे उपलब्ध असतील त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8080931748 असा आहे. गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद  त्यांचे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7721803101  हा आहे.

नागरिकांनी पुर्व परवानगीने श्री. जुंगीओ यांना भेटावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY