वसमत, कळमनुरीतील अधिका-यांचे रविवारी प्रशिक्षण शिबीर

0
75

प्रतिनिधी /हिंगोली- जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांच्यासाठी पहिले प्रशिक्षण शिबीर येत्या सहा ऑक्टोबर 2019 रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 10.00 ते 02.00 व दुपारी 02.00 ते 06.00 अशा दोन टप्प्यात बहिर्जी स्मारक विद्यालय, कारंजा चौक, वसमत येथे आयोजित करण्यात आल्याचे वसमत विधानसभा संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण फुलारी यांनी कळविले आहे.  93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 11.00 ते 02.00 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शासकीय मुलांचे वसतीगृह कळमनुरी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  प्रशांत खेडेकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY