मोबाईलच्या अतिवापराच्या दुष्परिणामांबाबत जिवंत देखाव्यातून जनजागृती जय जवान मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम

0
460

प्रतिनिधी / पुणे  – पुणे येथील  मंगळवार  पेठेतील  जय जवान मित्र मंडळाने यंदा आपल्या सावर्जनिक गणेशोत्सवात  मोबाईलच्या  अतिवापराच्या  दुष्परिणामांबाबत  जिवंत  देखाव्यातून  जनजागृती केली. मंडळाचे अध्यक्ष  राहुल कांबळे  यांच्या पुढाकाराने  यंदा या विषयावर देखावा करण्याचे ठरले.

आजच्या काळात  मोबाईल गरजेचे रूपांतर  व्यसनात  झाले असून, लहानथोरांना  त्याची सवय  जडून गेली आहे, विशेषतः  तरुण पिढीवर त्याचे खूप  दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे  डोळ्यांचे विकार, मानेचे विकार  तसेच अनेकांना  मानसिक आजारही  होत आहेत. देशात  सध्या १२२ कोटी  मोबाईल धारक असून यामध्ये  तरुणांची  संख्या सर्वाधिक आहे. गाडी चालवताना देखील  दुचाकी  व मोटारचे चालक  मोबाईल वापरात व्यस्त असल्याने अपघात घडल्याचे स्मोकर आले आहे. दिवसातील कामाच्या वेळेतील मौल्यवान  वेळ हा केवळ मोबाईलच्या सवयीमुळे वाया जात आहे हे बऱ्याच जणांच्या  लक्षातसुद्धा  येत नाही. हे वास्तव लक्षात घेऊनच याबाबत जनजागृती करण्याच्या  दृष्टीने एक कल्पक कथानक तयार करून या विषयावर जीवनात देखावा  सादर करण्यात आला. यामध्ये राहुल निगडे, श्रद्धा पुणेकर, सुधीर भालेकर, अंजली  जाखडे  व  सम्यक  या नाट्य अभिनेत्यांनी आपल्या  अभिनयाद्वारे विषयाची रंजक  मांडणी केली.

सावर्जनिक गणेशोत्सवातुन प्रबोधन करण्याची आपली  परंपरा चालू ठेवत  जय जवान मंडळाने केलेल्या  या देखाव्याला  प्रेक्षकांनींही  उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY