वृत्तसंस्था /नवी दिल्ली- जगातील सर्वात अत्याधुनिक व एकाच वेळी दाही दिशांना क्षेपणास्त्र फेकू शकणारे राफेल लढाऊ विमान येत्या 8 ऑक्टोबरला भारताच्या हवाई दलात रूजू होणार आहे. पाकिस्तान व चीन यांना काळजीत टाकणारी राफेल विमानाची क्षमता आहे.
भारताच्या वायुसेनेचे एअर मार्शल बी.आर. चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये जाऊन राफेल विमानाची चाचणी घेतली होती. त्यानंतर सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. पुढील महिन्यात 8 ऑक्टोबरला साजर्‍या होणार्‍या वायुसेना दिनी समारंभपूर्वक राफेल विमान फ्रान्स भारताच्या ताब्यात देईल.
हे राफेल विमान भारतात आणण्यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व वायुसेना प्रमुख बी.एस. बनुआ हे फ्रान्सला जाण्याची शक्यता आहे. भारताला फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी करणार आहे. त्यापैकी पहिले राफेल विमान 8 ऑक्टोबरला येईल. राफेल विमानांच्या पाचपट वाढलेल्या किमतीमुळे काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हा प्रचाराचा मुद्दा केला होता.

LEAVE A REPLY