कोल्हापुरात 25 सप्टेंबरला अंबाबाईचे दर्शन राहणार बंद

0
476

प्रतिनिधी /कोल्हापूर- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव ही भाविकांना आगळी पर्वणीच असते. या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात तयारीला वेग आला आहे. बुधवार 25 सप्टेंबर रोजी मुख्य गाभार्‍याची स्वच्छता होणार असल्याने यादिवशी दिवसभर अंबाबाईचे दर्शन बंद राहणार आहे.
मुख्य गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार असल्यामुळे भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार नसले तरी भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येईल. त्याचप्रमाणे या नवरात्र उत्सव काळात भाविकांना अडचण ठरणारी मंदिर परिसरातील अतिक्रमणेही हटवली जाणार आहेत. उद्या रविवारी मंदिर परिसरातीतील विशेषत: पश्चिम दरवाजासमोरील कापड विक्रेते व अन्य साहित्याचे स्टॉल हटवले जाणार आहेत.

LEAVE A REPLY