पुन्हा मीच मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

0
116
प्रतिनिधी / मुंबई – निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. त्यातच मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. युतीबाबतच्या तर्कवितर्काना आलेल्या उधाणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी भाजप-शिवसेना निश्चितपणे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत शिवसेना-महाराष्ट्रात भाजपसोबत समान जागांवर लढण्यावर अडून होती, पण आता १२६ जागांवर राजी होताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप १६२ जागा जिंकू शकते. मात्र आपल्या लहान मित्रपक्षांनाही भाजप जागा देणार आहे. एकीकडे भाजपने सत्तेचा दावा केला आहे तर काँग्रेसचे म्हणणे आहे की जनता भाजपला सत्तेबाहेर काढण्याच्या तयारीत आहे. कांग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, राज्यात शेतकरी चिंतेत आहेत. आत्महत्येचे सत्र सुरू आहे. आम्ही सत्ताबदलाची वाट पाहत आहोत. हरयाणातही लोक भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील.

LEAVE A REPLY