भारताकडून ‘गली बॉय’ ऑस्करच्या शर्यतीत

0
290

वृत्तसंस्था / नवी दिल्ली – रणवीर सिंग अभिनीत ‘गली बॉय’ हा सिनेमा भारताकडून 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे.
‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमांवर ‘गली बॉय’ने मात केली. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती. ‘गली बॉय’ या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गली बॉय’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता.

LEAVE A REPLY