बालशक्ती, कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
26

हिंगोली, दि.20: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बाल शक्ती पुरस्कार- ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यतच्या ) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कार : वैयक्तीक पुरस्कार: मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

संस्था स्तरावर : बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

बाल शक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे . अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत होती. आता ती दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY