आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सूचना

0
213

प्रतिनिधी / हिंगोली- राज्य विधानसभा निवडणुकीत सर्व समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने काम करा. काम करताना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल. याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधानसभा निवडणुकीचे समन्वय अधिकारी तथा विभाग प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी , उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले की, निवडणूक कालावधीत सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले जावे.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोविंद रणवीरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रवीणकुमार घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्यासह यंत्रणेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. तत्पुर्वी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या दालनात झाली. त्यांनी आजपासून आचारसंहिता अंमलात आली असून आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना दिल्या.

राजकीय सभांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी संबंधित यंत्रणा कडून घेतल्या जाव्यात. यासाठी निवडणूक आयोगाने विविध मोबाईल अप्लिकेशन विकसित केली आहेत. त्याचबरोबर वेबसाईटवरुनही परवानगी मिळू शकते. प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी केली जावी. ईलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मिडीयावरुन राजकीय जाहिरात करण्यापुर्वी ती जाहिरात पुर्वप्रमाणीकरण करुन घेतली पाहिजे. त्यासाठी संबंधित समितीकडून जाहिरात पुर्वप्रमाणीकरण करुन घ्यावी. माहिती पुस्तिका, हैण्डबिले मुद्रण करताना त्यावर प्रकाशक आणि संख्या यांची माहिती प्रकाशित करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अण्णाजी शिंदे, शिवसेनेचे किशोर मास्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडु कुटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY