माजी नगरसेवक प्रकाश वसेकर यांचे निधन

0
125
प्रतिनिधी / हिंगोली – राजकारणातील चाणक्य म्हणून सर्वदूर परिचित असलेले गवळीपूरा भागातील माजी नगरसेवक प्रकाश वसेकर यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंगोली शहरामध्ये मागील काही वर्षापूर्वी राजकारणातील धुरंदर चाणक्य म्हणून परिचित असलेले प्रकाश दत्तात्रय वसेकर यांनी गवळीपुरा भागातून जवळपास १५ वर्ष नगरसेवक म्हणून उत्कृष्टरित्या काम केले. राजकारणातील हेवेदावे बाजुला सारून एकमेकाच्या सहकार्याला धावून येणारे प्रकाश वसेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे पूर्ण केली. भारतीय विद्या मंदिर, कयाधु शिक्षण संस्था या ठिकाणी विश्वस्त म्हणून कामकाज पाहिले. तसेच आदर्श एज्युकेशन संस्था, ब्राम्हण सभा व वासुदेवानंद ट्रस्टवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रकाश वसेकर (उंडेगावकर) हे मागील काही महिन्यापासून आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात येत होता. या दरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असताना १६ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने हिंगोलीत आणण्यात आले होते. १६ ऑगस्ट रोजी पहाटे ५.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच विविध स्तरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन वसेकर कुटूंबीयांचे सात्वन केले. दुपारी ३ च्या सुमारास गवळीपुरा भागातून अंत्ययात्रा निघून कयाधु नदीच्या तीरावरील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आ. रामराव वडकुते, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, न.प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, माजी नगराध्यक्ष एन.एफ. बांगर, नगरसेवक अ‍ॅड. सुनील भुक्तर, जीतसिंह साहु, कृउबास माजी उपाध्यक्ष रामेश्वर शिंदे, अ‍ॅड. के.के. शिंदे, डॉ. विजय निलावार, प्रा. मदन मार्डीकर, अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी, अ‍ॅड. सिरसाट, चौधरी, सोनी यांच्यासह विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY