संख्याशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमीत्त ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
291

प्रतिनिधी / हिंगोली – महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांचा जन्मदिवस दि. 29 जून हा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा नियोजन सभागृहात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, प्रा. श्रीमती ज्योती झंवर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर, संशोधन सहाय्यक उत्तम शेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, संख्या शास्त्रामध्ये महालनोबिस यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. यावर्षी ‘संतुलित विकास उद्दिष्ट’ हा महत्वाचा विषय ठरविण्यात आला असून, आर्थिक व्यवहारात संख्याशास्त्राचा महत्व वाढतच चालला आहे. कोणत्याही प्रकारच्या नियोजन कार्यात सांख्यिकी हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. गिरगांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले की, दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबीस यांच्या प्रतिमानावर आधारित तयार करण्यात आली होती. प्रशांत चंद्र महालनोबीस हे पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी नियोजन मंडळाचे सदस्य ही होते. प्रशासनामध्ये संख्याशास्त्राचा जास्तीत-जास्त्‍ा प्रभावीपणे कसा वापर करता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न्‍ा करण्याचे आवाहन केले.

प्रा. ज्योती झंवर यांनी शासनाने आखणी केलेल्या 17 निर्देशांकाबाबत शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले योगदान दिले पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे श्री. भिसे, श्री. सोमवंशी, श्री. दिंडे, त्र्यंबक दळवी, आनंद शिरसाठ, गोविंद पौळ, संजय भोसले, सुनिल भोसले, अजिंक्य दुपारते, अश्रुबा जोरवर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांनी केले तर श्री. शेटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY