सातवी आर्थिक गणना कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

0
221

प्रतिनिधी / हिंगोली –केंद्रशासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून ७ व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले असून जिल्ह्यात सातवी आर्थिक गणना कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, प्रा. ज्योती झंवर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जयवंशी पुढे म्हणाले की, यापुर्वीची ६ वी आर्थिक गणना २०१३ मध्ये संपन्न झाली होती. सातव्या आर्थिक गणनेचे वैशिष्टय म्हणजे पुर्णत: माहिती तंत्रज्ञानावर आधारीत आहे. सदर गणना ही टॅबच्या सहाय्याने प्रगणक आणि पर्यवेक्षक करणार आहेत. केंद्रशासनाच्या NSSO मार्फत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन त्यांचे अंतर्गत CSC (Common Service Centre) मार्फत ७ व्या आर्थिक गणनेचे काम करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

या सातव्या आर्थिक गणनेमध्ये माहिती संकलन, वैधतीकरण, सनियंत्रण, पर्यवेक्षण व विश्लेषण इत्यादी बाबीचा समावेश आहे. प्रगणक प्रत्येक घराघरात जावून गणना करणार आहे.  या आर्थिक गणनेमध्ये कृषि क्षेत्रास व  संरक्षण क्षेत्रास यामधुन वगळण्यात आले आहे असेही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.

शासनाच्या नियोजन विभागाच्या दि. २१ जून, २०१९ च्या शासननिर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे तसेच या समितीचे सदस्य सचिव जिल्हा सांख्यिकी अधिकारी आहेत. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना योग्य्‍ा माहिती देवून सहकार्य करावे असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांनी सांगितले.

सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी CSC विभागीय व्यवस्थापक प्रशांत राजगुरु व CSC जिल्हा व्यवस्थापक स्व्‍ाप्नील पंडीत यांनी परिश्रम घेतले आहे.

LEAVE A REPLY