क्रीडा सुविधा अंतर्गत क्रीडा साहित्याचे वाटप

0
224

प्रतिनिधी / हिंगोली – क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मौजे आडगांव ता. जि. हिंगोली येथे क्रिडा सुविधा अंतर्गत आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी त्यांना शालेय जीवनात खेळाचे महत्व सांगितले. शासनामार्फत देण्यात आलेल्या क्रीडा सुविधांचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच गावातील नागरिक व खेळाडूंनी करावा व शरीराचे संवर्धन करावे असेही ते म्हणाले.

यावेळी सरपंच प्रशांत कंधारकर, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक गोपाल दंडे, दिपक जाधव, श्री. चौधरी खिल्लारी, श्री. टाकळगव्हाणकर, प्राचार्य विठ्ठल मुळकुळे, राजारामजी जाधव, विक्रमजी जाधव, भानुदास वाबळे, दत्तराव दंडे, अरुण लभाडे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY