बाल कामगार प्रतिबंध मोहिम व ऑपरेशन मुस्कान जनजागृती करण्यास प्रशासनास यश

0
379

प्रतिनिधी / हिंगोली –  बचपन बचाओ आंदोलन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मजुरी निर्मुलनासाठी दि.01ते 30 जुन या कालावधीत state action month आयोजित करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने जिल्हा बाल संरक्षण कक्ष,बालकल्याण समिती,बालकामगार विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्तरित्या राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गतबालकामगार प्रतिबंध मोहिम व ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले.

हिंगोली शहरातील सिध्दार्थ नगर, मार्केट कमिटी,रामलीला मैदान,मस्तानशहा नगर,ईदगाह रोड इत्यादी परिसरातशोध घेतला असता (हॉटेल,बेकरी,भंगार दुकान,ईलेक्टॉनिक दुकान,पान टपरी ई.) बाल कामगार आढळुन आले.  कळमनुरी व औंढा ना. शहरातील नांदेड रोड ,नवीन बसस्थानक, लमान देव, जुने बसस्थानक, मंदिर परिसर इत्यादी परिसरात शोध घेतला असता (मोटार सर्व्हिसिंग सेंटर,हॉटेल,पान टपरी ,ईलेक्ट्रॉनिक दुकान, फळ दुकान, न्हावीदुकान , मंदिर परिसर इ.) इत्यादी ठिकाणी  बाल कामगार आढळून आले.

वसमत शहरातील कौठा रोड ,आसेगाव फाटा,नांदेड रोड , भाजी मंडी, मोंढा, बसस्थानक ईत्यादी परिसरात शोधघेतला असता (विट भट्टी , मोटार गॅरेज, हॉटेल,ईमारत बांधकाम इ. )  बाल कामगार आढळुन आले व त्या बाल कामगारांनाबाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले व बाल कल्याण समिती ने बाल कामगार, बाल कामगारांच्या पालकाना /दुकान मालकांचे बाल कामगार अधिनियमानुसार समुपदेशन करून बालकांना त्यांच्या पालक / दुकान मालक यांच्या स्वाधीनकरण्यात आले. तसेच हिंगोली ,कळमनुरी,औंढा ना.,शहरातील लोकांचा मोहीम राबवित असतांना चांगला प्रतिसाद मिळाला व बालकायद्याबद्दल माहिती झाली,तसेच प्रत्येक तालुक्यातील वसमत शहर वगळता स्थानिक लोकांनी मोहीम राबविण्यासाठीचांगलीच मदत केली.त्यामुळे लोकांमध्ये जणजागृती झाल्याचे दिसुन आले.

एकूणच बाल कामगार प्रतिबंध मोहिम व ऑपरेशन मुस्कान राबवित असतांना बाल कामगाराची आर्थिक स्थितीफारच बिकट व हालाकीची दिसुन आली व बहुतेक बालकांचे पालक  हयात नाहीत  त्यामुळे बाल मजुरी करून उदरनिर्वाहकरतात, तसेच बालकांचे पालक शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यास तयार नाहीत असे दिसुन आले.

त्यावेळी या  मेाहिमेदरम्यान मिळणाऱ्या बालकामगारांना येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हाबाल संरक्षण कक्षाने त्या बालकांचे समुपदेशन करून त्यांना बाल कल्याण समिती समोर हजर करून त्याच्या पालकांकडूनहमीपत्र लिहुन घेण्यात आले.

संबधित कार्यादरम्यान बालकांना निरिक्षण गृहात पाठवून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मोहिमेअतंर्गत जिल्हामहिला व बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारीयांच्या प्रयत्नातुन ही मोहिम यशस्वीरित्या राबवुन हिंगोली , वसमत,औंढा(ना),कळमनुरी या ठिकाणी बाल कामगार(बालमजुरी) व ऑपरेशन मुस्कान बाबत जनजागृती करण्यात  आली, असे  जिल्हा बाल कल्याण कक्ष, हिंगोली यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY