श्रीस्वामी समर्थ यांच्या पालखीचे १० जूनला हिंगोलीत होणार आगमन

प्रतिनिधी / हिंगोली – १० जून सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामीचे पालखीचे केमीस्ट भवन, नांदेड रोड, हिंगोली येथे आगमन होणार आहे. त्या ठिकाणी ७.३० वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व पालखीचा मुक्काम तेथेच राहिल. त्यानंतर दुसNया दिवशी म्हणजे ११ जून रोजी सकाळी ६ वाजता महाअभिषेक व आरतीचा कार्यक्रम होईल.

स्वामीच्या पालखीचे सकाळी ७ वाजता कळमनुरी मार्गे नांदेडला प्रयाण होईल.  १० जून सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता केमीस्ट भवन नांदेड रोड हिंगोली येथे भक्तांनी हजर राहुन स्वामीच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी सहभागी होऊन स्वामी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन अ‍ॅड.बी.जी. खंदारे यांनी केले आहे.

या कार्यक्रमानिमित्त गजानन राटनालु, जिल्हा केमीस्ट अ‍ॅन्ड ड्रमीस्ट असोशिएशन हिंगोली आर्विâटेक्ट पवन बी. खंदारे, दिलीप पळसकर, जयेश खर्जुले, नारायण डिडाळे, सुधीर गोगटे, बालाजी टोम्पे, शिवाजी टोम्पे, अ‍ॅड. आर.टी. शिंदे, अ‍ॅड. श्रीधर घुगे, महाजन, अनुप नायक, अनिल चौधरी, राजश्री खंदारे, प्रिया खंदारे, नंदा घुगे, मागडे, लखमावर, उन्हाळे, रोहिनी खर्जुले, सुमित्रा डिडाळे परिश्रम घेत आहेत. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी श्री स्वामी समर्थ पालखीची महाराष्ट्र परिक्रमा चालु असून सदर पालखीचे परिक्रमेचा मुख्य उद्देश म्हणजे अक्कलकोट येथे न जाऊ शकणाNया महिला, अपंग, वयोवृध्द तसेच पुर्वीच्या व नविन भक्तांना स्वामी दर्शनाची आपल्या गांवी अपूर्व संधी मिळाली. तसेच अक्कलकोट येथे चालु असलेल्या अन्नदान उपक्रमास व होत असलेल्या भक्त निवास बांधकामास दानरुपाने ईश्वचरणी आर्थिक मदत करावी  आहे.

LEAVE A REPLY