मतदार जागृती अभियाण अंतर्गत रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांच्या हस्ते सन्मान

प्रतिनिधी / हिंगोली- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 मतदार जनजागृती अभियाण अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व सिद्धीविनायक सोसायटी एनटीसी हिंगोली च्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवार दि. 3 जून रोजी निवडणूक काळात मतदार जनजागृती अभियाण अंतर्गत आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास च्या सहाय्यक संचालक तथा सहसंयोजिका श्रीमती रेणुका तम्मलवार, समाजकल्याणचे सहाय्यक संचालक श्री.भाऊराव चव्हाण, डायटचे प्राचार्य श्री. गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्या कू. गुरूलीनकौर अलग, कू. गायत्री देशमुख, कू. कांचन वाकडे, कू. जयश्री गायकवाड, कू. मुस्कान अलग, कू. अंकिता मईग, सौ. संजिवनी मस्के, सौ. करूणा चौधरी, सौ. योगिता देशमुख, सौ. निर्मला अर्धापूरे या विजेत्यांचा जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या स्पर्धा तिन गटामध्ये मतदान टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियाण अंतर्गत घेण्यात आल्या होत्या. यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य व सहभागी महिला सौ. ज्योती कोथळकर, सौ. छाया मगर, सौ. अर्चना जाधव, सौ. उमा तांडूरकर यांच्यासह सिद्धीविनायक सोसायटी अध्यक्ष श्री. कल्याण देशमुख, सचिव श्री. गोविंद बियाणी यांचाही जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी यांनी लोकसभा निवडणुकीत मतदार जनजागृती अभियाण अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रशासन मतदार टक्का वाढविण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन करून रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही मतदार जनजागृती अभियाणात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन सिद्धीविनायक सोसायटीचे अध्यक्ष तथा पत्रकार श्री. कल्याण देशमुख यांनी तर आभार कौशल्य विकास सहाय्यक संचालक तथा सहसंयोजिका श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी व्यस्त केले.

LEAVE A REPLY