किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी रुमा यांचं निधन

वृत्तसंस्था / कोलकाता- दिवंगत पार्श्वगायक किशोर कुमार यांची पहिली पत्नी, गायिका, अभिनेत्री रुमा गुहा ठाकुरता यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. रुमा या प्रसिद्ध गायक अमितकुमार यांच्या मातोश्री असून प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या भाची होत्या.

रुमा यांनी १९४४ मध्ये आलेल्या ‘ज्वारभाटा’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी हिंदीशिवाय अनेक बंगाली चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी गंगा, अभिजान, पालातक, अँथोनी फिरंगी, ८० ते असियो ना, बालिका बधू, दादर कीर्ती, चोरिंग लेन, भालोबाशा भालोबाशा आणि व्हिलचेअर सारख्या गाजलेल्या सिनेमांतून काम केलं होतं. रुमा यांनी हिंदी आणि बंगालीशिवाय ‘नेमसेक’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केलंय.

अभिनयाशिवाय त्यांनी अनेक सिनेमांत पार्श्वगायनही केलंय. १९५० मध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते. पण अवघ्या आठ वर्षातच दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर किशोर कुमार यांनी मधुबालाशी लग्न केले होते. तर रुमा यांनी अरूप गुहा ठाकुरता यांचाशी लग्न केले होते.

LEAVE A REPLY