पुढच्या 7 महिन्यांत धावणार पुणे मेट्रो

प्रतिनिधी / पुणे – पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर येत्या डिसेंबरपर्यंत मेट्रो धावणार असल्याचा दावा “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत “महामेट्रो’चे प्रकल्प प्रमुख प्रशांत कुलकर्णी, वाघमारे आणि गौतम बिराडे यांनी ही माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या एलिव्हेटेड (उन्नत) मेट्रोचे काम सुमारे 45 टक्के पूर्ण झाले आहे. उरलेले काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शहरातील मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून, तीन टप्प्यातील मिळून सुमारे 31 टक्के काम पूर्ण आले आहे. त्यातील दोन टप्पे हे 50 टक्‍क्‍यांच्या जवळपास पोहोचले असून, तिसरा जिल्हा न्यायालय ते रामवाडी या टप्प्याचे काम आता सुरू झाले आहे.

LEAVE A REPLY