बिमस्टेक नेत्यांशी पंतप्रधान मोदींची चर्चा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिमस्टेक संघटनेतील राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. या राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मोदींनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भुतानचे पंतप्रधान लोताय शेरींग यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांनी बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशीही द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली.

मोदी आणि सीरिसेना यांनी दहशतवादाचा संघटीतपणे मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय उपखंडातील देशांनी तसेच दक्षिण अशियाई देशांना शांतता आणि सुरक्षा कायम टिकवण्यासाठी परस्परांशी अधिक सहकार्याने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्‍त केला आहे. मोदींनी सर्वच राष्ट्रप्रमुखांचे शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. आणि या देशांना भारताकडून सर्व शक्‍य ते सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY