शोपियामध्ये दहशतवादी – सुरक्षादलांमध्ये चकमक, गोळीबार सुरू

वृत्तसंस्था /नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये शोपियामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं समजतंय. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, शोपिया जिल्ह्यातील दरगन सुगन भागात ही चकमक झाली. आत्तापर्यंत या चकमकीत कुणीही दहशतवादी मारला गेल्याची बातमी नाही. सुरक्षादलानं संपूर्ण भागाला वेढा घातलाय. सविस्तर माहिती थोड्याच वेळात हाती येऊ शकेल.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षादलांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार, सोपोरच्या डांगरपुरा भागाला घेराव घालून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला. सुरक्षादलानं प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय.

LEAVE A REPLY