हिंगोलीत बारावीचा निकाल ८०.७७ टक्के

प्रतिनिधी / हिंगोली – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला असता हिंगोली जिल्ह्यातून नियमित परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यात मुलांपेक्षा मुलींनीच जिल्ह्याची टक्केवारी वाढविण्यात आघाडी घेतली. एकूण मुलांच्या यशाची टक्केवारी ही ७६.०१ राहिली तर मुलींची टक्केवारी ही ८६.९९ एवढी राहिली. जिल्ह्याचा एकूण निकाल हा ८०.७७ एवढा लागला आहे. दरम्यान, पुरवणी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींचा निकाल हा १६.९७ एवढा राहिला आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण १२ हजार ६२५ एवढ्या विद्यार्थ्यांची नोंद बारावी परीक्षेसाठी होती. यात १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात विशेष प्राविण्यासह ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ४ हजार ३९६ एवढी तर द्वितीय श्रेणीत पास होणाऱ्या विद्यार्थी संख्या ही ४ हजार ९७३ एवढी राहिली. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १८१ असा आहे. एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १० हजार १८७ एवढी असल्याने निकालाची टक्केवारी ८०.७७ एवढी राहिली आहे. पुरवणी परीक्षेमध्ये एकूण ५९८ विद्यार्थ्यांची नोंद होती. यात ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालाची टक्केवारी ही १६.९७ एवढी राहिली आहे. जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून ४ हजार ६०९ विद्यार्थ्यांची नोंद होती. यात ४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण निकालाची टक्केवारी ही ८९.९० एवढी राहिली. कला शाखेतून ६ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात निकालाची टक्केवारी ही ७३.७५ राहिली आहे. वाणिज्य शाखेतून ८८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात निकालाचा टक्का हा ९०.४८ एवढा राहिला आहे. एमसीव्हीसी मधून हिंगोली जिल्ह्यात ३३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात निकालाचा टक्का हा ७१.६९ एवढा राहिला आहे. १२ हजार ६२५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती तर १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ६६७ विद्यार्थी उत्तर्णी झाल्याने एकूण निकालाचा टक्का हा ८०.७७ एवढा राहिला आहे.

LEAVE A REPLY