हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

????????????????????????????????????

प्रतिनिधी/ हिंगोली- मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगांचे प्रश्न खितपत पडल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. शासन दरबारी वारंवार विनंत्या, निवेदने देवूनही त्याकडे कानाडोळा होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात दिव्यांगांचे निराधार अनुदान नवीन अध्यादेशाप्रमाणे वाटप करावे व दिव्यांगांना समितीवर घ्यावे, अपंग विकास महामंडळाचे कर्ज माफ करणे, २०० स्के. फुट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे, सामान्य रूग्णालयामध्ये दिव्यांग, वयोवृध्दांना सुविधा द्याव्यात, शासकीय कार्यालयात दिव्यांगांसाठी तळमजल्यावर सुविधा देणे, शासकीय रूग्णालयातील हेळसांड थांबवून दिव्यांगांना योग्य ती टक्केवारी देण्यात यावी, सरकारी दिव्यांग कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बसून सेवा करण्याची संधी द्यावी, अंत्योदय व घरकुलामध्ये विनाअट दिव्यांगांना सामावून घ्यावे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र दिव्यांग भवन उभारण्यात यावे, संजय गांधी निराधार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी, ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना एक टक्के जागा कारकून पदासाठी राखीव असते त्या जागेसाठी दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश संबंधित ग्रामसेवक, सरपंचांना देण्यात यावा, दिव्यांंग, विधवा, निराधार यांचे बंद केलेले अनुदान तात्काळ वाढीव प्रमाणे चालू करण्यात यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन करण्यात आले. प्रहार जिल्हा प्रमुख ॲड. विजय राऊत, युवा जिल्हाप्रमुख रवी बांगर, रमेश मांडगे, सचिन परळकर, प्रदीप वानरे, रंगनाथ मुटकुळे, हनुमान टेकळे, धम्मरत्न मोरे, बालाजी होडगिरे, गणेश दासरे, गोपाल देशमुख, भागवत मुटकुळे, मारोती कोरडे, राम दुर्गे यांच्यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते..

LEAVE A REPLY