हिंगोली शहरात भगवान श्री राम नववी मोठ्या उस्ताहात साजरी

राम जन्मोहसवानिमित्त भव्य मोटार सायकल रॅली संपन्न

0
582

प्रतिनिधी/हिंगोली- हिंगोली शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान श्री राम नववी निमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंद दल यांच्या आयोजनातुन आज दि.13 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता सिटी क्लब हिंगोली येथुन भव्य मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

श्री राम नवमी निमित्त हिंगोली शहरात बजरंग दल व विश्व हिंदु परिषद यांच्या आयोजनातुन आज दि.13 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता सिटी क्लब,हिंगोली येथून मोटार सायकल रॅलीची सुरु करुन संकट मोचन हनुमान मंदीरात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने राम भक्तांनी हजेरी लावली होती. यावेळी राम,लक्ष्मण, सिता, हनुमान यांची झाकी देखील करण्यात आली होती. सवार्र्ंचे आकर्षन ठरली होती. रॅलीत राम भक्तांनी जय श्री राम, जय श्री रामच्या जयघोषात संपुर्ण हिंगोली शहरात हादरुन टाकले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY