काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची उमेदवारी हि सुभाष वानखेडे यांना जाहीर

0
1280

प्रतिनिधी / हिंगोली – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा – शिवसेना यांची युती झाल्यामुळे हिंगोली येथील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची उमेदवारी हि सुभाष वानखेडे यांना जाहीर झाली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीस काँग्रेसचे खा. राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक लढवीत नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा उमेदवार कोण यावर प्रश्नचिह्न निर्माण झाले होते.
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांनी जाहीर झाले त्यावर भाजपा-शिवसेना युतीचा लोकसभा क्षेत्राबाहेरील उमेदवार चालणार नाही, असे सुभाष वानखेडे यांनी प्रत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
सुभाष वानखेडे हे पूर्वी शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. युतीचा निर्णय मान्य नसल्याचा त्यांनी शंखनाद केला. तसेच आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची उमेदवारी हि सुभाष वानखेडे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता हिंगोली लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार होणार सरल्याचे राजकीय वर्तुळातून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY