प्रतिनिधी /सेनगाव – सेनगाव येथील प्रतिष्ठित नागरिक साहेबराव तुकाराम तिडके यांना मोबाईलवर मी साडणी चा मुलगा असल्याची बतावणी करून मी पुणे रेल्वे टेशन वर माझे पाकीट मारले असल्याची सांगून तुम्ही मी सांगितलेल्या रेल्वे अधिकाऱ्याच्या खाते नंबर वर पैसे टाका अशी बतावणी करून सहा हजार रुपयांनी घडविले असल्याची घटना सेनगाव शहरात दिनांक 13 मार्च रोज बुधवार अंदाजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटाच्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की सेनगाव येथील प्रतिष्ठित व स्वस्त धान्य दुकानदार साहेबराव तुकाराम तिडके यांना दिनांक 13 मार्च रोजी बुधवार रोजी दुपारी अडीच च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन आला. मी तुमच्या साडणी चा मुलगा बोलतोय. माझे पुणे रेल्वे स्टेशनवर चोरट्यांनी पाकीट मारले व माझ्याकडे आता कुठले पैसे  नाहीत. तरी मी येथील  रेल्वे अधिकाऱ्यांचा खाते नंबर देतो, असे सांगून त्यांनी साहेबराव तिडके यास या मोबाईल क्रमांक 8530850730 या नंबर वरून कॉल करण्यात आला. व त्यांनी संबंधित रेल्वे अधिकार्याचा खाते नंबर34679773748 हा नंबर दिला व या नंबर वर पैसे तात्काळ टाका अशी विनवणी केली. संबंधित साहेबराव तिडके यांनी आपला साठवणीचा मुलगा अडचणीत असल्याने त्यांनी तात्काळ एका वेळेस 1000 व दुसऱ्या वेळेस 5000 असे एकूण सहा हजार रुपये संबंधित खात्यात जमा केले व दोन दिवसांनी सांडणीच्या मुलास मोबाईल द्वारे विचारणा केली असता त्या मुलाने मी मी तुम्हाला कुठलाच फोन केला नाही. ही व पैशाची मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळेस साहेबराव तिडके यास आपली कोण्या तरी अज्ञाताकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. व  संबंधिताने संबंधित खात्याची माहिती घेतली असता ती लातूर जिल्ह्यातील शिरूर  तालुक्यातील कारेवाडी  पोस्ट ये रोड येथील असल्याची माहिती मिळाली.

संबंधित खाते धारक मल्हारी वैजनाथ घोल पे असे नाव तपासणीदरम्यान आढळून आले फिर्यादी साहेबराव तिडके यांनी माझी फसवणूक झाल्याबाबत सेनगाव पोलिसात रीतसर यात दिली असून परंतु अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. संबंधित नागरिकांनी अशा कॉलपासून सावध राहाव…. पोलीस उपनिरीक्षक जाधव शहरासह सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी अशा फसव्या काल पासून सावध राहावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. याची प्रत्येक नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आव्हान सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी आर जाधव यांनी केले. अनेक वेळा मी मी बँकेमधून बोलतो आहे आपले खाते नं बंद पडतोय किंवा आपले ए टी एम कार्ड बंद केल्या जात आहे. अशी बतावणी करून आपले पिन नंबर सांगा असे भासवून अनेक वेळा फसवणूक केल्या जात आहे. तरी नागरिकांनी कुणासही आपल्या बँक खात्या विषयी किंवा आर्थिक व्यवहाराविषयी कुणासही काही सांगू नये वेळेत सावध व्हावे असे जाधव यांनी सांगितले. अशा संबंधित कुणाचीही फसवणूक झाल्यास त्यांनी संबंधित हद्दीतील ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक बी आर जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY