मातंग समाजाने सत्यशोधक बनावे-सचिन भाऊ साठे   

0
622

प्रतिनिधी / सेनगाव- सेनगाव येथे एक दिवशीय मातंग समाज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी तमाम मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे यांच्या सत्यशोधक विचाराचे पाईक बनण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी तमाम मातंग समाजाने अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा असलेल्या गोष्टी दूर करून युवा पिढीने शिक्षणाच्या प्रवाहात येऊन एकसंघ होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे यांची बहिणीचे नातू गणेश भाऊ भगत गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या एक दिवशी चर्चासत्रात सचिन भाऊ साठे यांनी आपले विचार मांडताना त्यांनी राज्यात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अन्याय अत्याचार वाढ झाली असल्याची सांगितले. या समाजावर जुलमी अत्याचार होऊन सुद्धा समाज समाज शांत का असा सवाल करत मी मातंग समाजाचा नेता असल्याची मला लाज वाटत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यात यात अनुसूचित जाती मधून आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे यासाठी समाजातील संजय भाऊ ताकतोडे या तरुणांनी जलसमाधी घेतली. परंतु या राज्य शासनाने जाणीवपूर्वक या समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी केला तर येणाऱ्या लोकसभेत समाजांनी एकत्र येऊन आपल्या मताची योग्य मोजमाप करून त्याचा उपयोग घेण्याचे आवाहनही उपस्थित समाज बांधवांना केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप खंदारे माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे ्‍यंकटी सोनटक्के जगन खंदारे गरुड सर आश्रुबा खंदारे पत्रकार बबन सुतार भागवत डोंगरे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाप्रसंगी मानव हित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून निवडी करण्यात आल्या, यामध्ये तालुकाध्यक्ष मधुकर कांबळे तालुका सचिव मधुकर सुतार शहराध्यक्ष राजू जाधव युवा अध्यक्ष मोहन सुतार सदस्य योगेश कांबळे यासह सह अनेक तरुणांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मातंग समाजातील महिला सह पुरुष व युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे संचालन भागवत डोंगरे तर आभार पत्रकार बबन सुतार यांनी मानले.

LEAVE A REPLY