हिंगोलीत रामेश्वर ते अयोध्या रामराज्य रथयात्रेचे जल्लोशात आगमन

0
364

प्रतिनिधी / हिंगोली – रामराज्य रथयात्रेचे आयोजन रामेश्वर ते अयोध्या दि. ४ मार्च ते १४ एप्रिल २०१९ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास हिंगोली आगमन झाले.

विश्वहिंदू परिषद व बजरंग दल हिंगोली यांचा वतीने रामेश्वर ते अयोध्या रामराज्य रथयात्रेचे मोठ्या जल्लोशात हिंगोली येथे अकोला बायपास आगमन झाल्या वेळी राम भक्तांनी फटाक्यांची आतिशबाजी व फुलांची उधळण करीत जय श्री राम, जय श्री राम च्या जयघोषात स्वागत केले.
हि रथयात्रा हिंगोली अकोला बायपास मार्गे जिजामाता नगर हुन गायत्री मंदिरात विश्राम करीत राम भक्तांना श्री शक्ती शांतानंद महर्षी यांनी या रथयात्राचे महत्व समजावून सांगितले.
हि रामेश्वर ते अयोध्या रामराज्य रथयात्रेचे आयोजन जगदगुरू स्वामी सत्यानंद सरस्वतीजी यांनी सुरु केले असून स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री शक्ती शांतानंद महर्षी हे नेतृत्व करीत आहेत. हि रथयात्रा दि. ४ मार्च ते १४ एप्रिल २०१९ पर्यंत तामिळनाडू, पुटूचेरी, आंधप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश या राज्यातून ४१ दिवसांचा प्रवास करीत श्री राम नवमी ला अयोध्येत पोहचणार आहे. हिंगोली येथून हि रथयात्रा औंढा नागनाथ मार्गे परभणी येते जाणार असल्याचे
श्री शक्ती शांतानंद महर्षी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY