भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देणार, इम्रान खान यांची दर्पोक्ती

0
113
पाकिस्तानला सध्या स्थिरता हवी आहे. त्यामुळे आम्ही, असे हल्ले करण्याचा विचारही करणार नाही. आम्हाला हिंसा नको आहे. मात्र, भारताने हल्ला केल्यावर आम्ही गप्पही बसणार नाही. जर तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही ते संपवू, असे म्हणत त्यांनी भारताला युद्धाचा विचार न करण्याचा इशारा दिला. काश्मीरप्रश्न फक्त चर्चेने सुटू शकतो, असे म्हणत त्यांनी नव्या पाकिस्तानात दहशतवादाला थारा नसल्याचे म्हटले आहे.

युद्ध सुरू करणे ही सोपी गोष्ट आहे. मात्र, ते संपवणे प्रचंड अवघड असून त्याचे परिणाम फक्त देवालाच माहित, असे म्हणत त्यांनी पाकिस्तान युद्धासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले. दहशतावादाचा सर्वात जास्त फटका पाकिस्तानलाच बसला असून त्यांनी पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे नाकारले.

LEAVE A REPLY