मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली – अशोक नाईक

0
345

प्रतिनिधी / हिंगोली- वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असा आश्वासन मुख्‌यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

(छाया – विजय गुंडेकर)

शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक यांचा धनगर समाजाला आरक्षण दिले नसल्यामुळे शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्रीश्री देवेंद्र फडणविस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नसल्याने तसेच युतीने शब्द पाळला नसल्याने पक्ष पदाचा तसेच हिंगोली पालिकेतील नगरसेविका श्रीमती लताबाई शंकरराव नाईक यांनीही नगरसेवक पदाचा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. यावेळी नगरसेवक गोपाळ अग्रवाल, सुभाष बांगर, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात दिले होते. एवढेच नव्हे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आश्वासन दिले होते. मात्र, ४ वर्षे पूर्ण होऊनही अद्याप पर्यंत आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज नाराज आहे. माझ्या शिवसेनेतील पदाचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा उद्धव साहेबांकडे सुपूर्द करणार आहे.त्यांच्या वहिनी लताबाई शंकर नाईक यांनी नगसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतीही भूमिका बजावत नाहीत. त्यामुळेच त्यांनी गेल्या ३६ वर्षांपासून सोपवलेली शहर प्रमुखाची जबाबदारी स्वीकारून उपयोग तरी काय, असा सवाल त्यांनी केला.
हिंगोली येथून ११ घोडे गुरुवारी मुंबईकडे निघाले आहेत. ते आज औंधा नागनाथपर्यंत पोहचले आहेत. मुंबईला जाईपर्यंत १०१ घोडे यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच, प्रवासादरम्यान ज्या ज्या गावात धनगर समाज आहे, तेथून १ घोडा आणि ११ मावळे, असे उद्दिष्ट्ये असल्याचे नाईक यांनी सांगितले. एवढे करूनही महायुती असलेल्या सरकारने आरक्षणाचा विचार केला नाही. यापुढे शासकीय वाहनाच्या चाकातील हवा सोडून देण्याचा निर्णय धनगर समाजाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY