‘वन स्टॉप सेंटर’ अंमलबजावणी एजन्सीकरीता अर्जाची मागणी

0
309

प्रतिनिधी / हिंगोली- संकटग्रस्त किंवा अडचणीत सापडलेल्या महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी केंद्र शासन पुरस्कृत ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना हिंगोली येथे सुरु होत आहे. जिल्ह्यात या वन स्टॉप सिसेस सेंटर योजना राबविण्याकरीता अमंलबजावणी एजन्सी नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर अमंजलबजावणी एजन्सीद्वारे पिडीत महिलांना प्रशिक्षण  देणे, कर्मचारी क्षमता  बांधणी व तांत्रिक मदत करणे इत्यादी काम सदर एजन्सीला करावे लागेल.

या वन स्टॉप सेंटर योजनेच्या व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार अमंलबजावणी एजन्सीला कार्यवाही करावी लागेल. समितीच्या निर्देशानूसार कामकाज न केल्यास एजन्सीची सेवा बंद करण्यात येईल, अमंलबजावणी एजन्सीकरिता आवेदन करणारा संस्थेला अन्यायग्रस्त, संकटग्रस्त, पिडीत  महिलांच्या हिताच्या क्षेत्रात काम करण्याचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणे, कर्मचारी क्षमता बांधणी व तांत्रिक मदत या क्षेत्रातील  अनुभव आवश्यक आहे, आवेदन करण्याच्या संस्थेच्या घटना नियमावलीमध्ये अन्यायग्रस्त, संकटग्रस्त, पिडीत  महिलांसाठी  कार्य करण्याचा उल्लेख असलेल्या संस्थेलाच आवेदन सादर करता येईल. तसेच सदर कामाबाबत दहा मिनिटांचे सादरीकरण करावे लागेल. अमंलबजावणी एजन्सीकरिता आवेदन करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेला ठराव जोडण्यात यावा.अटी व शर्तींचे पालन करण्यासंबंधी रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदन करणारी संस्था (अ) संस्था नोंदणी अधिनियम 1860 (ब) सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत आवश्यक , संस्था  काळ्या यादीत समावेश नसल्याबाबतचे धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

निती आयोगाची नोंदणी असणे आवश्यक आहे,संस्था ही हिंगोली  जिल्ह्यातंर्गत  नोंदणीकृत असावी, अमंलबजावणी एजन्सीकरिता नियुक्ती झालेल्या संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे पोलीस विभागाकडून चारित्र्य प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात येईल. आवेदन अर्ज वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सात दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली कार्यालय एस-7, दुसरा  मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली 431513 येथे सादर  करावा. विलंबाने आलेल्या आवेदन पत्राचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ‍हिंगोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY