स्पर्श आभियान बाबत मा.रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक

0
543
प्रतिनिधी / हिंगोली-  रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्म वर्धापन व 30 जानेवारी 2029 कुष्ठरोग निवारण दिना निमित्त ” स्पर्श ” कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समिती ची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे स्वागत डाँ.शिवाजी पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, डाँ.किशोरप्रसाद श्रीवास जिल्हा शल्यचिकित्सक व डाँ.राहुल गिते सहाय्यक संचालक कुष्ठरोग यांनी केले या बैठकीत स्पर्श आभियान हे संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 30 जानेवारी ते  13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाडा म्हणून राबविण्यात येणार आहे. यावेळी डाँ.राहुल गिते सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांनी कुष्ठरोग व स्पर्श आभियान बाबत संपूर्ण माहिती दिली या मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यां मार्फेत निबंध स्पर्धा घेण्यात येणार तसेच  प्रत्येक गावात प्रभातफेरी व ग्राम पंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी यांनी या आभियानाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी जनजागृती करुन हे आभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत सुचना दिल्या या स्पर्श  आभियानात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा आशा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमानाने हे स्पर्श आभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच यावेळी उपस्थितानी स्पर्श आभियान यावेळी रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, जगदिश मिनियार अप्पर जिल्हाधिकारी, दाताळ  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गणेश वाघ महिला बाल कल्याण अधिकारी, डाँ.शिवाजी पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, डाँ.किशोरप्रसाद श्रीवास जिल्हा शल्यचिकित्सक, डाँ.राहुल गिते सहाय्यक संचालक कुष्ठरोग, डाँ.सुनिल देशमुख, डाँ.नामदेव कोरडे , डाँ.रौफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी, शंकर तावडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, अझरअल्ली जिल्हा आशा समन्वयक, प्रशांत तुपकरी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, लहानकर, पुंडगे, आघाव, चव्हाण, उबाळे, होकर्ण, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा आशा समन्वयक या विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY