जिल्हा वार्षिक योजनेत हिंगोली जिल्ह्याची 40 कोटीची अतिरिक्त मागणी

0
339

प्रतिनिधी / हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2019-20 करीता सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत 98 कोटी 74 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. आज औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 40 कोटी 20 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक संपन्न झाली. या बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, अप्पर मुख्य नियोजन देवाशीष चक्रवर्ती, डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्हास्तरीय मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची माहिती सादर करत विविध कामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले. पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी जिल्ह्याच्या विविध विकास कामाकरीता अतिरिक्त केलेली मागणी मंजूर करुन हिंगोली जिल्ह्यास  निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

तसेच बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी आमदार डॉ.मुंदडा यांनी सेनगाव तालूक्यासाठी विश्रामगृहाची मागणी केली असता, वन विभागाने सार्वजनीक बांधकाम विभागाकडून नकाशा तयार करुन 15 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच हिंगोली, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालूके मानव विकास समाविष्ट असून, या तीन तालूक्यातील अंगणवाड्या बांधकामाकरीता मानव विकास अंतर्गत 8 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच औंढा नागनाथ येथील शासनाकडे सादर केलेल्या पर्यटन विकासाचा आराखड्‌याचे मुंबई येथे येवून सादरीकरण करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY