विज्ञान शिक्षक कृष्णराव कुलकर्णी भांडेगांवकर यांचे निधन

0
206
प्रतिनिधी / हिंगोली- येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयातील सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक कृष्णराव भांडेगावकर वय 70 यांचे दि 17 जानेवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी ब्राम्हण सभेचे सचिव म्हणून काम केले.
उत्कृष्ट विज्ञान शिक्षक असल्यामुळे त्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवत शाळेला पारितोषिक मिळवून दिले होते. तसेच त्यांचा विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकीक होता. त्यांच्या पश्‍चात चार मुली, एक मुलगा तसेच दोन भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि 18 जानेवारी, शुक्रवारी येथील कयाधूच्या तीरावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY