हिंगोलीत पतंजलीच्या योग शिबीराचे उद्घाटन

0
303
प्रतिनिधी / हिंगोली- पतंजली मार्पâत आदर्श महाविद्यालयातील योग शिक्षक तथा पतंजली जिल्हा संघटनमंत्री प्रा.बी.टी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील लालालजपराय नगरातील जागृत हनुमान मंदिर परिसरात १७ जानेवारीपासून आठ दिवस योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे १७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी नाना उंबरकर, व्ही.जी ढाले, नंदकिशोर लोंढे, दैनिक देशोन्नती व्यवस्थापक शिवाजी मेटकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून योग शिबीरास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी लालालजपतराय नगरवासीयांसह शहरातील नागरिकांनी या शिबीरास भरभरून प्रतिसाद दिला. आठ दिवस चालणाNया या योग शिबीरात हिंगोली शहरवासीयांना आरोग्य स्वास्थ्याचे मोफत धडे दिले जाणार आहेत. सदरील शिबीर पहाटे ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा पतंजली जिल्हा संघटन योग शिक्षक प्रा. बी.टी. राठोड यांच्यासह चव्हाण, गुठ्ठे, जायभाये, घुगे, सोवितकर, बोरकर, लेकुळे, पवार, जैस्वाल, राठोड, काळे, अ‍ॅड. राजेश गोटे, सोवितकरताई,गुठ्ठेताई, बोरकरताई,येवलेताई हे योग शिक्षक शहरवासीयांना आरोग्य स्वास्थ्याचे मोफत धडे देत आहेत. सदरील शिबीर आठ दिवस चालणार असले तरी योग साधक  वर्षभर आरोग्य स्वास्थ्याचे धडे घेणार आहेत.पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय गायकवाड तर आभार प्रदर्शन सोवितकर यांनी मानले.या शिबीरात लालालजपतराय नगरासह हिंगोली शहरवासीयांनी सहभाग नोंदवून आरोग्य स्वास्थ्याचे धडे घेण्याचे आवाहन योग शिक्षक प्रा. बी.टी.राठोड यांच्यासह लालालजपतराय नगरवासीयांनी केले आहे.शिबीराच्या यशस्वीतेसाठी नगरवासीय परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY