पुण्यात 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करुन शेजाऱ्याने मृतदेह पुरला

0
323

प्रतिनिधी / पुणे पुण्यात 15 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या करुन त्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्याच्या तरुणानेच खंडणीसाठी अपहरण करुन त्याचा जीव घेतला. वारजे-माळवाडी भागात निखिल अनंत अंग्रोळकरचा मृतदेह पुरण्यात आला होता.
निखिलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने खंडणीसाठी निखिलचं अपहरण केलं होतं, मात्र त्याने वडिलांना फोन करुन सांगितल्यामुळे हत्या करण्यात आली. हत्येनंतर पुण्यातील वारजे परिसरात निखिलचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता.
निखिल नेहमीप्रमाणे घरी परत न आल्यामुळे वडील अनंत अंग्रोळकर यांनी वारजे पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी निखिलने वडिलांना फोन करुन आपल्याला जबरदस्तीने दुचाकीवरुन नेलं जात आल्याचं सांगितलं.
यामुळे आरोपी बिनयसिंग घाबरला आणि त्याने निखिलची हत्या केला. त्यानंतर चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला नेऊन खड्डा खोदला आणि त्यात त्याचा मृतदेह पुरला.

LEAVE A REPLY