पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीमला जन्मठेप

0
346

वृत्तसंस्था /नवी दिल्ली पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम याला आज पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर केले. 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राम रहीमला रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. रामचंद्र यांनी बाबा राम रहीमच्या डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्ये उघड केली होती. त्यानंतर 2002 मध्ये रामचंद्र यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी बाबा राम रहीमवर हत्येचे आरोप करण्यात आले होते. त्याच्यावर विशेष सीबीआय कोर्टात खटला सुरु होता. रामचंद्र यांच्या हत्येनंतर 17 वर्षांनी बाबा राम रहीमला शिाक्षा सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY