अमरावतीत चंद्रशेखर आझादांची जाहीर सभा पोलिसांचा बंदोबस्त

0
325

प्रतिनिधी / अमरावती – भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद यांची शहरतील सायन्सकोर मैदानावर विदर्भस्तरीय जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने अमरावतीत होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रशेखर आझाद यांना ऐकण्यासाठी नागरिक सायन्सकोर मैदानावर गर्दी करीत आहेत. या सभेत सुषमा अंधारे, शेख सुभान अली यांसारखे प्रमुख वक्ते उपस्थित राहणार आहेत. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एम. सायन्सकोर यांनी मैदानावर तगडा पोलीस बंदोबस्त केला आहे.

 

LEAVE A REPLY