भाजपच्या लोकसभेच्या प्रचाराचा नारळ सोलापुरात फुटणार

0
364

प्रतिनिधी / सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 जानेवारी रोजी सोलापूर येथे जगातील सर्वात मोठ्या स्वस्त घरांच्या योजनेचे भूमीपूजन करण्यासाठी येणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्यावेळीच मोदी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी1811 कोटींची आवास योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तीस हजार घरे बांधण्यात येणार आहेत. तब्बल 188 एकर जागेमध्ये ही घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेत केंद्र सरकारकडून 450 कोटी, राज्य सरकारकडून 300 कोटी देण्यात येणार आहे. या घरांच्या किंमती साडे तीन लाख रुपये असणार आहे. या आवास योजनेसोबतच 244 कोटींचा पाणी वाटप प्रोजेक्ट आणि 205 कोटींच्या मल: निसारण प्रोजेक्टचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9 जानेवारी रोजी होणार आहे. या वेळी पंतप्रधान लोकसभेच्या प्रचाराचे पहिले भाषण करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मार्च 2022 पर्यंत 20 लाख घरे बांधण्याचे लक्ष्य़ आहे. यातील 9.5 लाख घऱांना आता पर्यंत मंजूरी मिळाली असून लवकरच त्या घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY